शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सच्या भागीदाराला अटक; मुंबईतील बनावट कंपनीची पुण्यातूनही विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 15:49 IST

आरोपींनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथे मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनी असून ती या औषधांची निर्मिती करीत असल्याचे भासविण्यात आले आहे.

पुणे : बनावट औषधांची निर्मिती करुन जिल्ह्यातील विक्रेत्यांना विक्री केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील उमेद फार्मा सेल्सविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सचे भागीदार प्रभाकर नामदेव पाटील (रा. कल्याणीनगर) यांना अटक केली आहे. याबरोबरच मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनीचा चालक सुदीप सुरेशकुमार मुखर्जी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध विभागाचे निरीक्षक विवेक खेडकर यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

आरोपींनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथे मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनी असून ती या औषधांची निर्मिती करीत असल्याचे भासविण्यात आले आहे. 

मुंबईच्या अन्न व औषध प्रशासनाला कोरोनाच्या काळात तपासणीमध्ये मॅक्सरिलीफ हेल्थकेअर या कंपनीच्या नावाने कोरोना संसर्गावर उपचारात वापरली जाणारी फविपिरावीर आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ही औषधांची निर्मिती हिमाचल प्रदेशात केली जात असल्याचे त्यावरील लेबलवरुन आढळून आले. याबाबत हिमाचल प्रदेशातील एफडीएकडे विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी आम्ही मॅक्सरिलीफ हेल्थ केअर नावाच्या कोणत्याच कंपनीला औषध निर्मितीचा परवाना दिला नसल्याचे सांगितले. त्यावरुन एफडीएच्या फिर्यादीवरुन मुंबई पोलिसांनी १ कोटी ५४ लाख रुपयांची बनावट औषध जप्त केली. तसेच त्याची निर्मिती करणार्‍या सुदीप सुरेशकुमार मुखर्जी याला अटक केली आहे. तपासणीत या कंपनीकडून विनापरवाना ५ वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची निर्मिती केली जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार एफडीएच्या मुख्यालयातून राज्यातील सर्व कार्यालयांना याबाबतची माहिती देण्यात आली. 

पुणे कार्यालयामार्फत केलेल्या तपासणीत कोरेगाव पार्क येथील एका कंपनीमार्फत या औषधांचे मार्केटिंग केले जात असल्याची माहिती मिळाली. तसेच ही औषधे उमेद फार्मा सेल्सच्या मदतीने ती पुणे व इतर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना विक्री करुन फसवणूक केली जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटकmedicineऔषधं