जेजुरी गडावर उमाजी नाईक जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:14 IST2021-09-08T04:14:02+5:302021-09-08T04:14:02+5:30

जेजुरी गडाच्या पायरी मार्गावर असणाऱ्या उमाजीराजे नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांच्या हस्ते पुष्पहार ...

Umaji Naik Jayanti celebration at Jejuri fort | जेजुरी गडावर उमाजी नाईक जयंती साजरी

जेजुरी गडावर उमाजी नाईक जयंती साजरी

जेजुरी गडाच्या पायरी मार्गावर असणाऱ्या उमाजीराजे नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. या वेळी बोलताना निकुडे यांनी मंदिरावर जाणाऱ्या पायरी मार्गावरील कमानीवजा प्रवेशद्वाराला आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे नाव देण्याचा विश्वस्त मंडळाच्या विचाराधीन असल्याचे या वेळी सांगितले. तसा ठराव केल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, भाजपचे युवा अध्यक्ष सचिन पेशवे, प्रसाद अत्रे, सेनेचे शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे, नगरसेवक जयदीप बारभाई, राजेंद्र चौधरी, विशाल बारभाई, यशवंत दोडके, शिवाजी चव्हाण, संतोष खोमणे, शरद माकर, सचिन शिंदे, यशवंत भांडवलकर, सुंदर खोमणे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक युथ फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र खोमणे यांनी केले, तर आभार सचिव माऊली खोमणे यांनी मानले.

फोटो : आद्य क्रांतिवीर उमाजीराजे यांच्या २३० वी जयंती मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

070921\1527-img-20210907-wa0049.jpg

उमाजीराजे नाईक जयंती प्रसंगी उपस्थित मान्यवर

Web Title: Umaji Naik Jayanti celebration at Jejuri fort