शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

उजनी धरणावर होणार तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, हजार मेगावॉटची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:58 IST

उजनी धरणावर हजार मेगावॉटचा तरंगता सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा तरंगता सौर प्रकल्प उभारल्यानंतर एका वर्षात कमीत कमी १ टीएमसी पाण्याचे बाष्पीकरण टाळून पाण्याची बचत करता येईल.

बारामती : उजनी धरणावर हजार मेगावॉटचा तरंगता सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा तरंगता सौर प्रकल्प उभारल्यानंतर एका वर्षात कमीत कमी १ टीएमसी पाण्याचे बाष्पीकरण टाळून पाण्याची बचत करता येईल. तसेच, या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही उजनी धरणालगतच्या शेतकऱ्यांना दिवसा वापरण्यास देण्यात येणार आहे.हा तरंगता सौर प्रकल्प उभारल्यानंतर एका वर्षात कमीत कमी १ टीएमसी पाण्याची बचत करता येईल. तसेच, जमिनीवर उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या तुलनेत तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाची कार्यक्षमता ६ टक्क्यांनी अधिक अपेक्षित आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून वीजनिर्मितीचे महत्त्व लक्षात घेऊन हे पाऊल टाकले आहे. राज्यातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेकरिता महावितरण कंपनीने अशा ऊर्जास्रोतांपासून तयार होणाºया विजेकरिता स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे वीजखरेदीबाबत विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. या उपक्रमात पवन व सौर स्रोतांबरोबरच उसाची चिपाडे, कृषिजन्य टाकाऊ पदार्थांसारख्या स्रोतांचा वीजनिर्मितीत समावेश आहे.राज्यातील शेतक-यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत महावितरणने निविदा काढलेल्या आहेत.या निविदा प्रक्रियेत यशस्वी झालेल्या सौरऊर्जा प्रकल्प विकसकांसोबत वीजखरेदी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, भविष्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेअंतर्गत नवीन निविदा काढण्याचे प्रयोजन केले आहे.सध्या ग्रीड संलग्न राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय सौरऊर्जा प्रकल्पातून १००० मेगावॉट वीजखरेदीकरिता निविदादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. त्याअनुषंगाने महावितरण कंपनीने सदर प्रकल्पासाठी स्वारस्याचे प्रकटीकरण मागविले होते. सदर स्वारस्य प्रकटीकरणद्वारे मिळालेल्या सूचनांचा विचार करण्यासाठी, तसेच तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत या क्षेत्रातील मर्यादित अनुभवाचा विचार करून तरंगता सौर प्रकल्प आस्थपित करण्यासाठी आवश्यक अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी शासनातर्फे महावितरणच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने २७ सप्टेंबर २०१८ रोजी शासनाला अहवाल सादर केला होता. तसेच, १८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने या प्रकल्पाला दिलेली मान्यता व समितीच्या शिफारशीनुसार महावितरण कंपनीने नुकत्याच प्रकल्पातून वीजखरेदीबाबत निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.जमिनीवरील उपलब्ध नैसर्गिक स्रोतांच्या वापरावर मयार्दा येत असल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या तलाव/ धरणांच्या पाण्यावर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे.ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उजनी धरण (जि. सोलापूर) येथे जलाशयावर १००० मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. महावितरण कंपनीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवातझाली आहे.सदर स्पर्धात्मक निवड प्रक्रिया उलट बोलीसह करण्यात येणार आहे. सदर निविदेत तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकसक किमान १०० मेगावॉट क्षमता ते १००० मेगावॉट क्षमता स्थापित करू शकेल. त्यासाठी समितीने उजनी धरण येथील जलाशयावर प्रत्येकी १०० मेगावॉटच्या १० जागा निश्चित केल्या आहेत. त्या ठिकाणी प्रकल्प विकसक तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारू शकतो.प्रकल्प विकसकाला तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासोबत विजेचे निष्कासन करण्याची प्रणाली उभारायची आहे.

टॅग्स :Puneपुणे