उजनी 100 टक्के भरले; उद्योगांचा पाणीप्रश्न कायम

By Admin | Updated: September 6, 2014 23:41 IST2014-09-06T23:41:16+5:302014-09-06T23:41:16+5:30

उजनी धरण 1क्क् ट़क्के धरण भरले आहे.त्यामुळे पुणो,सोलापुर,नगर जिल्ह्यातील शेतीच्या,पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Ujani filled 100 percent; Industry's water problem persisted | उजनी 100 टक्के भरले; उद्योगांचा पाणीप्रश्न कायम

उजनी 100 टक्के भरले; उद्योगांचा पाणीप्रश्न कायम

बारामती : उजनी धरण 1क्क् ट़क्के धरण  भरले आहे.त्यामुळे पुणो,सोलापुर,नगर जिल्ह्यातील शेतीच्या,पाण्याचा प्रश्न  मार्गी लागला आहे.मात्र,बारामती एमआयडीतील उद्योगांचा पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे.गरजेपुरता पाणीपुरवठा होत नसल्याने आजही येथील उद्योगांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.विकतच्या पाण्यासाठी उद्योगांनी करार देखील केले आहेत.या पाण्यासाठी कोटय़ावधी रुपये या उद्योगांना मोजावे लागत आहेत.
बारामती एम आय डी सी त अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग आहेत.या उद्योगांची दररोज किमान 12 दशलक्ष लीटर पाण्याची गरज  आहे.मात्र,प्रत्य़़क्षात केवळ 8 दशलक्षलीटर पाणी उद्योगांना मिळत असल्याची उद्योजकाची तक्रार आहे.उर्वरीत पाणी विकत टँकरने विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. उजनी  धरण  1क्क् टक्के भरुन देखील हे चित्र बदलण्याची कोणतीही शक्यता नाही.हे चित्र बदलणार कधी ,असा संतप्त सवाल उद्योगांकडुन व्यक्त होत आहे.उजनी धरणातुन एमआयडीसी ला पाणीपुरवठा करणा:या जलवाहीनी तुन 4क् ट़क्के पाण्याची गळती होत असल्याचे देखील उद्योजकांचे निरी़़़क्ष़ण आहे.
 याबाबत बारामती चेबर ऑफ कॉमर्स अॅण्ड  इंडस्ट्रीज  चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की,गतवर्षी 11क् ट़क्के  धरण भरले होते.तरी देखील पाण्याची समस्या कायम आहे.या वर्षी धरण 1क्क् टक्के भरले आहे.एम आयडीसीला  पाणीपुरवठा करणा:या जलवाहीनीतुन होणारी पाण्याची गळती थांबवावी.उद्योगांना पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात यावा ,अशी आमची आग्रही मागणी आहे.उद्योगांना ंटकर ने पाणी विकत घेण्याची वेळ येउ नये,अशी आमची माफक अपेक्षा आहे.या बरोबरच एम आय डीसीत आणखी आंतर राष्ट्रीय उदयोग येउ पाहत आहेत.अगोदरच असणा:या उद्योगांना पाणी पुरत नाही.त्यामुळे नव्याने येणा:या उदयोगाना पाणी देणार कोठुन हा प्रश्न निरुत्तरीतच आहे.यासाठी दिर्घकाळीन उपाययोजना करण्याची गरज आहे.
चेंबरच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देखील मंजुर केला आहे.याबाबत चे टेंडर देखील निघाले आहेत .मात्र प्रभावीपणो या कामांना गती देण्याची गरज जामदार यांनी व्यक्त केली आहे. 
(प्रतिनिधी)
 
पुणो :  धरणांच्या पाणलोट क्षेत्रतील पाऊस आज सकाळ पासून थांबला आहे. आज दिवसभरात या धरणांच्या पाणलोट क्षेत्रतील पाऊस पूर्णपणो थांबला असला,तरी, आसपासच्या परिसरात होणा-या पावसाचे पाणी धरणात मोठया प्रमाणात येत आहे. त्यामुळे या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पानशेत धरणातून 1688 क्यूसेक, वरसगाव धरणातून 650 क्यूसेक, तर टेमघर धरणातून 114 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी खडकवासला धरणात येत असल्याने तसेच खडकवासला धरणही 98  टक्के भरले असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून खडकवासला धरणातूनही मुठा नदीत 1710 क्यूसेक आणि कालव्याद्वारे 1336  क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
 
धरणपाणीसाठा विसर्ग (नदीत)
खडकवासला98}171क् क्यूसेक
पानशेत1क्क्}992 क्यूसेक
वरसगाव1क्क्}65क् क्यूसेक
टेमघर1क्क्}114 क्यूसेक

 

Web Title: Ujani filled 100 percent; Industry's water problem persisted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.