शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उजनी होतेय झपाट्याने रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 20:27 IST

उजनी धरणातून सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शंभर टक्के भरलेले धरण झपाट्याने कमी होऊ लागले आहे.

ठळक मुद्देआज अखेर धरणात ६८.५७  टक्के पाणीसाठा आहे. उजनीतून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्याचे नियोजन गाळपेर करण्यासाठी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांची धडपड सुरु

भिगवण : उजनी धरणातून सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शंभर टक्के भरलेले धरण झपाट्याने कमी होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असल्याने तसेच पाण्याच्या होणाऱ्या अतिवापरामुळे धरणातील साठा झपाट्याने घटू लागला आहे. आजअखेर धरणात ६८.५७  टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी यादिवशी धरण शंभर टक्के भरलेले  असल्याची माहिती संबंधित विभागाकडून मिळाली. यंदा मात्र धरणाच्या पातळीत झपाट्याने घट होत असल्याने उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकरी वर्गासमोर येणारे पाणीसंकट तसेच विजेची होणारी कपात या समस्या भेडसावू लागल्या आहेत. यंदा पावसाने ग्रामीण भागात पाठ फिरविल्याने खरीप वाया गेला. त्यातच नदीकाठच्या उसाच्या पट्ट्यात हुमणी रोगाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकºयांचे नुकसान झाले. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. कारण सोलापूरला पाणीपुरवठा करणारा औज बंधाºयाच्या नावाखाली अनेकांची शेती सुजलाम सुफलाम होत आहे. मात्र, उजनी धरणग्रस्तांना अद्याप हक्काच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे. उजनी धरणाच्या बोगद्याला विरोध करण्याची वेळ धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आली आहे. उजनी धरणातून मराठवाड्याला पिण्याच्या पाण्यासाठी बोगद्याचे काम झाले आहे. पुढे तेथील लोकांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाणी सोडले तर पाणीपातळीत मोठी घट होऊन धरण कोरडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  उजनीच्या बोगद्याला विरोधच... नीरा, भीमा नद्यांचे जोडप्रकल्प करून त्या धरणातील पाणीसाठा उजनी धरणात सोडून नंतर उजनीतून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्याचे नियोजन आहे. मात्र, या प्रकल्पाला धरणग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध कायम असताना काम सुरूच असल्याने संतापलेल्या शेतकरीवर्गाने आंदोलनाच्या तयारीस सुरुवात केली आहे.उजनीतून पाणी सोडण्यात आल्याने पातळी खाल्यावल्याने पाण्याखाली गेलेल्या जमिनी हळूहळू उघड्या पडू लागल्याने गाळपेर करण्यासाठी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांची धडपड सुरु झाली आहे.

टॅग्स :BhigwanभिगवणUjine Damउजनी धरणWaterपाणी