शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या निषेधार्थ 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार - उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 16:12 IST

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याचे संपूर्ण पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. 

उदयनराजे भोसले म्हणाले, हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तरी परवडलं असत. असे बोलत असताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. येत्या 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर आक्रोश व्यक्त करणार आहोत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

भारत मोठी लोकशाही असला तरी तुकडे होण्यास किती वेळ लागणार

ज्या ज्या वेळेस महाराजांची अवहेलना केली जाते. त्या त्या वेळी राग कसा येत नाही. सर्वच पक्षाचा मूळ अजेंडा हा शिवरायांचे विचार आहेत. तसं नसेल तर शिवरायांचे नाव तरी का घेता. भावी पिढीसमोर काय इतिहास ठेवणार. चुकीचा इतिहास ठेवला तर येणाऱ्या पिढीला हाच खरा इतिहास वाटेल. राष्ट्रद्रोहाच्या कायद्यासोबतच महापुरुषांचा अपमान होणार नाही याबद्दलही कायदा करावा. इतिहासासोबत अशीच छेडछाड सुरू राहिली. तर भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असला तरी तुकडे होण्यास किती वेळ लागणार आहे.

तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही का? 

शिवरायांचा महाराष्ट्र आहे. लोकशाहीतले राजे लोकं आहेत. त्यांनीच आता जागे व्हावे. लोकशाहीतले राजे कधी जागे होणार. शिवरायांची अवहेलना म्हणजे आपली अवहेलना, त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान. त्यांनीच आता जाब विचारावा. त्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काहीतरी ठरवण्याची वेळ आली आहे. शिवजयंती तरी साजरी का करायची, शिवरायांचे पुतळे तरी का उभारायचे. जेव्हा त्यांचा अपमान होतो तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीRaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज