वारज्यात वाहने पेटविण्याचा प्रकार
By Admin | Updated: November 15, 2016 03:50 IST2016-11-15T03:50:12+5:302016-11-15T03:50:12+5:30
वारजे येथे पार्क केलेली दोन मोटारसायकली व रिक्षा पेटवून देण्याची घटना पहाटे उघडकीस आली़ याप्रकरणी प्रवीण चौधर (वय २६, रा़ वारजे) यांनी फिर्याद दिली

वारज्यात वाहने पेटविण्याचा प्रकार
पुणे : वारजे येथे पार्क केलेली दोन मोटारसायकली व रिक्षा पेटवून देण्याची घटना पहाटे उघडकीस आली़ याप्रकरणी प्रवीण चौधर (वय २६, रा़ वारजे) यांनी फिर्याद दिली आहे़ रामनगरमधील जय भवानी चौकातील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी सायंकाळी दोन मोटारसायकली व रिक्षा पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या़ पहाटे तीनच्या सुमारास कोणीतरी त्यावर पेट्रोल टाकून ही तिन्ही वाहने पेटवून दिली़ त्यात त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ (प्रतिनिधी)