त्यागमूर्ती रमाई कोट्यवधींच्या काळजात आई म्हणून कोरली गेली : प्रा. नानासाहेब सानप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST2021-02-08T04:09:39+5:302021-02-08T04:09:39+5:30

इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि.७) रोजी सकाळी १० वाजता भीमाई आश्रमशाळेत माता रमाबाई ...

Tyagamurti Ramai was carved as the mother of millions of sorrows: Prof. Nanasaheb Sanap | त्यागमूर्ती रमाई कोट्यवधींच्या काळजात आई म्हणून कोरली गेली : प्रा. नानासाहेब सानप

त्यागमूर्ती रमाई कोट्यवधींच्या काळजात आई म्हणून कोरली गेली : प्रा. नानासाहेब सानप

इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि.७) रोजी सकाळी १० वाजता भीमाई आश्रमशाळेत माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. नानासाहेब सानप बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे, सचिव अॅड. समीर मखरे तसेच संस्थेचे सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. रेश्मा झेंडे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेबांच्या प्रत्येक वाटचालीत रमाईची अर्धांगिनी म्हणून खंबीर साथ होती म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक कार्यात यशस्वी झाले.

यावेळी कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार, राजेंद्र सोनवणे, राजेंद्र हाळनोर, अधीक्षक अनिल ओहोळ, अनिसा मुल्ला, नीता भिंगारदिवे आदी शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचारी संतोष शिंदे, महावीर गायकवाड, जगदीश कांबळे यांनी परिश्रम घेतले.

_______________________________________

फोटो ओळ : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट येथे माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करताना शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व मान्यवर.

Web Title: Tyagamurti Ramai was carved as the mother of millions of sorrows: Prof. Nanasaheb Sanap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.