दुचाकींच्या अपघातात दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:58+5:302021-02-05T05:05:58+5:30
विकास गोकूळ जगताप (वय २२ सध्या रा. संतोषनगर भाम), युवराज लुमा दिघे सध्या (रा. चाकण, ता खेड) अशी अपघातात ...

दुचाकींच्या अपघातात दोन तरुण ठार
विकास गोकूळ जगताप (वय २२ सध्या रा. संतोषनगर भाम), युवराज लुमा दिघे सध्या (रा. चाकण, ता खेड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण आहे. घाटातील एका लेनलगत धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची एक लेन पूर्णपणे बंद आहे. एक लेन सुरू असल्याने जाणारी व येणारी वाहने या रस्त्याचा वापर करून सुसाट वेगाने धावत असतात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली. यात दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत्यू घोषित केले. या अपघातात महेंद्र मच्छिंद्र जारकड ( रा. अवसरी, ता आंबेगाव ) हा जखमी झाला आहे. घटनास्थळी अजून एक अपघातग्रस्त चारचाकी वाहन उभे होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे करीत आहेत
फोटो ओळ. खेड घाटातील नवीन महामार्गावर झालेल्या अपघातात चेंदामेंदा झालेल्या दुचाकी गाड्या...