शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन युवक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:04 IST

आदिवासी भागातील आपटाळे खिंडीत भरदिवसा रानडुकरांनी अचानक केलेल्या हल्ल्यात दोन युवक जखमी झाले.

ठळक मुद्देअचानक रानडुकराने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते दोघेही दुचाकीवरून पडले.

जुन्नर : आदिवासी भागातील आपटाळे खिंडीत भरदिवसा रानडुकरांनी अचानक केलेल्या हल्ल्यात दोन युवक जखमी झाले. अक्षय राजू गावडे (वय १९) व विकास किसन दुधवडे (वय २६, दोघेही रा. तेजूर, ठाकरवाडी) अशी जखमी युवकांची नावे आहेत. जखमींवर आपटाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जुन्नरला नेण्यात आले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून जखमींना औषधोपचारांसाठी तातडीची मदत देण्यात आली. सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास अक्षय व विकास दोघेही दुचाकीवरून आपटाळे खिंडीतून चालले होते. यावेळी अचानक रानडुकराने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते दोघेही दुचाकीवरून पडले. त्यानंतर चवताळलेल्या रानडुकराने अक्षयच्या तोंडावर धडक दिली. तसेच विकासवरदेखील हल्ला केला. भरदिवसा रानडुकराच्या हल्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. येथील ग्रामस्थ आधीच बिबट्याच्या दहशतीने रात्रीचे घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. रानडुकरांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना फारशा कधी घडलेल्या नाहीत. रानडुकराच्या १५ ते २० च्या कळपाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. संपूर्ण पश्चिम आदिवासी भागातील शेतकरी रानडुकरांच्या उपद्रवामुळे त्रस्त असल्याचे संदीप उत्तरडे यांनी सांगितले. रानडुकरांचा कळप रात्रीच्या वेळी शेतात उतरला, की संपूर्ण प्लॉट उद्ध्वस्त करतो. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात