शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune: कदमवाकवस्ती परिसरात दोन दिवसांत दोन युवकांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 19:54 IST

लोणी काळभोर ( पुणे ) : लोणी रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या ३६ वर्षीय युवकाने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची ...

लोणी काळभोर (पुणे) : लोणी रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या ३६ वर्षीय युवकाने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ८)उघडकीस आली आहे. रवींद्र राजेंद्र कुंदेकर (वय ३६, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र कुंदेकर याने का आत्महत्या केली, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनास्थळी रेल्वे पोलिस व कर्मचारी दाखल झाले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. त्याच्या पश्चात तीन मुली, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे. कदमवाक वस्ती हद्दीत एक दिवस अगोदरच पिटर थॉमस भोसले याने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.

तसेच शुक्रवारी (दि. ८) रवींद्र राजेंद्र कुंदेकर यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. दोन दिवसांत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने लोणी काळभोर व कदमवाक वस्ती परिसर हादरला आहे. दोघांनीही आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी