अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणास दोन वर्षे कैद

By Admin | Updated: April 27, 2017 05:18 IST2017-04-27T05:18:26+5:302017-04-27T05:18:26+5:30

अल्पवयीन मुलीसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला दोन वर्षे साधी कैद आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश

Two years imprisonment for a teenager who is abusive | अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणास दोन वर्षे कैद

अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणास दोन वर्षे कैद

पुणे : अल्पवयीन मुलीसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला दोन वर्षे साधी कैद आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी सुनावली.
शंकर रामा कांबळे (वय ३२) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. १३ वर्षांच्या मुलीच्या आईने यासंदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ३१ मार्च २०१५ रोजी दुपारी ही घटना घडली.
संबंधित मुलगी घरासमोरून छोट्या भावाला क्लासला सोडण्यासाठी निघाली होती. त्या वेळी कांबळे याने तिच्यासमोर अश्लील वर्तन केले. त्यानंतर मुलीने ही घटना तिच्या आईला सांगितली. त्याबद्दल कांबळे याला विचारणा केल्यानंतर त्याने शिवीगाळ केली होती. त्यानंतर कांबळेविरुद्ध फिर्याद देण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी या खटल्यात चार साक्षीदार तपासले.
(प्रतिनिधी)

Web Title: Two years imprisonment for a teenager who is abusive