गिफ्टच्या बहाण्याने दोन महिलांना ३३ लाखांना ऑनलाईन गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 09:50 PM2020-02-22T21:50:04+5:302020-02-22T21:52:00+5:30

सोशल मिडियावर ओळख वाढवून परेदशातून महागडे गिफ्ट पाठविले असल्याचा बहाणा करुन वेगवेगळी कारणे सांगून महिलांकडून ऑनलाईन पैसे लुुबाडण्याचा प्रकार थांबता थांबेना़.

Two women fetched 33 lakhs for gift sheds | गिफ्टच्या बहाण्याने दोन महिलांना ३३ लाखांना ऑनलाईन गंडा

गिफ्टच्या बहाण्याने दोन महिलांना ३३ लाखांना ऑनलाईन गंडा

Next

पुणे : सोशल मिडियावर ओळख वाढवून परेदशातून महागडे गिफ्ट पाठविले असल्याचा बहाणा करुन वेगवेगळी कारणे सांगून महिलांकडून ऑनलाईन पैसे लुुबाडण्याचा प्रकार थांबता थांबेना़.  अशा प्रकारे दोन महिलांना ३३ लाख रुपयांना गंडविल्याप्रकरणी शहरातील भारती विद्यापीठ आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़. 
या प्रकरणी आंबेगाव येथील एका ५९ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठात फिर्याद दिली आहे़.  हीा प्रकार ऑक्टोंबर २०१९ ते फेबु्रवारी २०२० दरम्यान घडला़.  या महिलेला फेसबुकवर एका अनोळखी व्यक्तीने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली होती़.  आपण थायलंड येथे राहत असून नामांकित कंपनीत कामाला आहे़. त्याच्याबरोबर या महिलेने फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवर चॅटिंग केले़. ईमेलवर माहितीची देवाण घेवाण केली़,  तिच्याशी मैत्री करुन विश्वास संपादन केला़. 
तिला महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले़. त्यानंतर दिल्ली एअरपोर्टवरहे पार्सलमध्ये सोने व डॉलर असल्याने कस्टमने ते अडविले असल्याचे सांगितले़.  ते सोडविण्यासाठी व त्या पार्सलमधील डॉलर भारतीय चलनामध्ये रुपांतरीत करण्यासाठी व जी एस टी इन्शुरन्स अशी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेला वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले़.  त्याप्रमाणे या महिलेने तब्बल १५ लाख ७ हजार रुपये बँक खात्यात भरले.  तरीही आणखी पैशांची मागणी होत असल्याने तिला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले़.  त्यानंतर तिने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली़  सायबर पोलिसांनी यातील आरोपींचे नाव निष्पन्न करुन अधिक तपासासाठी भारती विद्यापीठाकडे गुन्हा वर्ग केला आहे़. 
असा प्रकार विमाननगर येथील एका ३० वर्षाच्या महिलेबाबत घडला़ या महिलेला लंडन येथून गिफ्ट पाठविले असल्याचे सांगण्यात आले होते़.  गिफ्टमध्ये सोने, महागड्या हँडबॅग व परदेशी चलन पाठविले असल्याचे भासविले़ दिल्ली येथीलकस्टम ऑफिसमध्ये अडकले आहे़.  ते सोडविण्यासाठी या महिलेला वेगवेगळ्या कारणासाठी १७ लाख ७४ हजार रुपये बँक खात्यात भरायला लावण्यात आले़. त्यानंतरही कोणतेही गिफ्ट दिले नाही़ या महिलेने रक्कम परत मागितली असता पैसे परत करण्यास नकार देऊन तिची आर्थिक फसवणुक केली.

Web Title: Two women fetched 33 lakhs for gift sheds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.