टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: July 10, 2015 01:25 IST2015-07-10T01:25:40+5:302015-07-10T01:25:40+5:30
दुधाच्या टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण ठार झाला. हा अपघात मंचर-जारकरवाडी रस्त्यावर मेंगडेवाडी गावाच्या हद्दीत आज सकाळी झाला.

टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
मंचर : दुधाच्या टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण ठार झाला. हा अपघात मंचर-जारकरवाडी रस्त्यावर मेंगडेवाडी गावाच्या हद्दीत आज सकाळी झाला. काशिनाथ सखाराम अरगडे (वय ४६, रा. पिंपळगाव) असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दूध टँकर (एमएच १४-सीपी ६२९६) हा निरगुडसर-ब्राह्मणदरा फाटा मार्गे मंचरच्या दिशेने भरधाव निघाला होता. संतोष गंगाराम खुडे (रा. शिंगवे) हा टँकर चालवीत होता. तर, मोटारसायकल (एमएच १४-एबी ४३३१) ही समोरून येत होती. मेंगडेवाडी गावाच्या हद्दीत दुधाच्या टँकरने मोटारसायकलला जोरात धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार काशिनाथ सखाराम अरगडे हे गंभीर जखमी झाले.
अरगडे यांना उपचारांसाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच ते मरण पावले होते. अपघाताची फिर्याद तुषार सोपान टाव्हरे यांनी मंचर पोलिसांत दिली. टँकरचालक संतोष गंगाराम खुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)