दुचाकीस्वाराने पोलिसाच्या हाताचा घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:13 IST2021-09-21T04:13:45+5:302021-09-21T04:13:45+5:30

पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून थांबविलेल्या एका दुचाकीस्वाराने पोलीस कर्मचाऱ्याला दगडाने मारहाण करून हाताचा चावा घेतला. ही ...

The two-wheeler was bitten by a policeman | दुचाकीस्वाराने पोलिसाच्या हाताचा घेतला चावा

दुचाकीस्वाराने पोलिसाच्या हाताचा घेतला चावा

पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून थांबविलेल्या एका दुचाकीस्वाराने पोलीस कर्मचाऱ्याला दगडाने मारहाण करून हाताचा चावा घेतला. ही घटना एरंडवणा येथील सार्वजनिक रोडवर सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंगेश शमाकांत काळे (वय २९, ,रा. एरंडवणा, कोथरूड) याला अटक केली असून, त्याच्या विरुद्ध सरकारीकामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी परमेश्वर पाडळे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पाडळे हे कर्तव्यावर होते. त्या वेळी आरोपी मंगेश काळे हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असताना दिसून आला. त्याला पाडळे यांनी इशारा करून थांबवले. त्यावेळी थांबविल्याचा राग आल्याने काळे याने पोलीस कर्मचारी पाडळे यांना तू कशी काय ड्यूटी करतो? अशी धमकी देत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या डोळ्याच्यावर दगडाने मारून त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेतला. मारहाणीत पाडळे जखमी झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक किरण पावसे तपास करीत आहेत.

Web Title: The two-wheeler was bitten by a policeman