यवत परिसरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:55+5:302021-02-05T05:06:55+5:30
काल (दि.३०) रोजी मध्यरात्री सुमारास गावठाणात चोरांनी दोन दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यातील एक दुचाकी घेऊन जाण्यात चोरांना ...

यवत परिसरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट
काल (दि.३०) रोजी मध्यरात्री सुमारास गावठाणात चोरांनी दोन दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यातील एक दुचाकी घेऊन जाण्यात चोरांना यश आले तर एक दुचाकी पेठेत सोडून चोरांनी पोबारा केला.
यवत गावठाणात विठ्ठल रुक्मिणी मंदिरनजीक राऊतवाड्यातून दुचाकी चोरांनी पळविली.तर गणपती मंदिर जवळच्या गल्लीतील विठ्ठल गुजर यांच्या घरासमोरील दुचाकी घेऊन त्याचे हँडललॉक तोडून गाडी घेऊन जाताना तेथे राहणारे हॉटेल व्यासायिक संतोष राजगुरू घरी येत होते.कोणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने चोरांनी दुसरी दुचाकी तेथेच सोडून पळ काढला.
दुचाकी चोरून घेऊन जात असल्याचे संतोष राजगुरु यांच्या लक्षात आल्याने त्यांनी परिसरातील युवकांना याची माहिती दिली.यानंतर परिसरातील नागरिक जागे झाले होते.चोरीच्या घटनेची माहिती यवत पोलीस ठाण्यात संबंधित नागरिकांनी दिली आहे.गावठाणात दाट लोकवस्तीच्या भागात दुचाकी चोरांनी चोऱ्या सुरू केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.