दुचाकीची धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:08 IST2021-07-05T04:08:30+5:302021-07-05T04:08:30+5:30

धर्मा लक्ष्मण बच्चे (रा. औंढे, आंबोली, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत दुचाकीचालक निखिल गुलाब ...

Two-wheeler collision; One killed | दुचाकीची धडक; एक ठार

दुचाकीची धडक; एक ठार

धर्मा लक्ष्मण बच्चे (रा. औंढे, आंबोली, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत दुचाकीचालक निखिल गुलाब लोखंडे (वय ३०, रा सुगंधा बाग, रा. राजगुरुनगर) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचालक निखिल लोखंडे हे चाकण येथून शनिवारी रात्री १० च्या सुमारास मोटारसायकलवरून येत होते. पुणे नाशिक महामार्गावर शिरोली फाटा येथे रस्ता ओलांडणारे बच्चे यांना त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. दुचाकी वेगाने धडकल्याने बच्चे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीचालक लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ थिटे करीत आहे.

Web Title: Two-wheeler collision; One killed