नीरेमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोघींना कारने ठोकरले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:12 IST2021-04-02T04:12:38+5:302021-04-02T04:12:38+5:30

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन महिलांना कारने जोरदार धडक दिली आहे. यामध्ये दोघी महिला जखमी झाल्या ...

The two were on their way to a morning walk in Neere when the car hit them. | नीरेमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोघींना कारने ठोकरले.

नीरेमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोघींना कारने ठोकरले.

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन महिलांना कारने जोरदार धडक दिली आहे. यामध्ये दोघी महिला जखमी झाल्या असून यापैकी एकीच प्रकृती गंभीर आहे. ही घटना

वैशाली संजय काशीद (वय ४२), सुनिता बबन मोराळे (वय ३४ ) असे जखमी महिलांची नावे आहेत. ही घटना एक एप्रील रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वैशाली काशीद, सुनीता मोराळे आणि संजय किसन काशीद हे तिघे मॉर्निंग वॉकसाठी नीरा येथील मुख्य रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी एक नंबरप्लेट नसलेली कार भरधाव वेगाने त्यांच्या पाठीमागून आली व त्यांना धडक देऊन ती तशीच निघून गेली. त्यामध्ये वैशाली आणि सुनीता जखमी झाल्या. त्यांच्या सोबत असलेल्या संजय काशीद यांने तातडीने नागरिकांच्या मदतीने दोघींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघातानंतर कार चालक कारसह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अपघाताच्या ठिकाणा पासून पुढे गेल्यानंतर त्याची कार नीरा नदीच्या पुलावर बंद पडली. तो कार सोडून लोणंदच्या दिशेने पळून गेला. नीरा पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली असून. कारचे ही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. नीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संदिप मोकाशी करत आहेत.

--

Web Title: The two were on their way to a morning walk in Neere when the car hit them.