सराईत गुन्हेगाराकडून दोन दुचाकी वाहने आणि ११ मोबाईल फोन हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:24+5:302020-12-04T04:29:24+5:30
पुणे : सराईत गुन्हेगाराकडून दोन दुचाकी वाहने आणि ११ मोबाईल असा एकूण २ लाख २९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ...

सराईत गुन्हेगाराकडून दोन दुचाकी वाहने आणि ११ मोबाईल फोन हस्तगत
पुणे : सराईत गुन्हेगाराकडून दोन दुचाकी वाहने आणि ११ मोबाईल असा एकूण २ लाख २९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली.
राकेश जॉनी सकट (वय २१, रा. २२६ मंगळवार पेठ) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. डेक्कन पोलीस ३७९ मधील गुन्ह्याचा तपास करीत असताना डी. बी पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब भांगले, सचिन चव्हाण व श्रीकांत लोंढे यांना १ डिसेंबरला माहिती मिळाली की या गुन्हयातील गाडी चोरणारा त्या गाडीसह एसएम जोशी पुलाखाली मुठा नदीच्या पात्राजवळ थांबलेला आहे. त्यानुसार त्या ठिकाणी हा आरोपी आढळून आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीच्या डीक्कीची झडती घेतली असता एकूण १ लाख ३९ हजार रुपये किंमतीचे ११ मोबाईल मिळाले. तसेच विश्रामबागवाडा पोलीस स्टेशनच्या हददीत चोरीला गेलेली एक दुचाकी जप्त केली.
डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक गुन्हे राजू चव्हाण, डी. बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे, कर्मचारी राकेश गुजर, संजय शिंदे, घोडोपंत पांचाळ, सचिन कदम, बाळासाहेब भांगले, सचिन चव्हाण, विनय बडगे, दयानंद गायकवाड, गणेश तरंगे, श्रीकांत लोंढे, दादासाहेब बर्डे, शेखर शिंदे, शरद गोरे, शशीकांत ननावरे, श्रीराम कापरे आणि ज्योतीराम मोरे यांनी गुन्ह्याचा तपास केला.
..
.