दोन हजार तीनशे प्रकरणो निकाली
By Admin | Updated: December 13, 2014 23:08 IST2014-12-13T23:08:54+5:302014-12-13T23:08:54+5:30
सासवड येथे न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात एकूण 2 हजार 358 प्रकरणात तडजोडी झाल्या व 27 लाख रुपयांची वसुली झाली .

दोन हजार तीनशे प्रकरणो निकाली
सासवड : सासवड येथे न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात एकूण 2 हजार 358 प्रकरणात तडजोडी झाल्या व 27 लाख रुपयांची वसुली झाली .
या वेळी दिवाणी 19, फौजदारी 7क्8, प्रांत यांच्याकडील
27, तहसीलदारांकडील 14 ग्रामपंचायतींकडील 1 हजार पाचशे नव्वद प्रकरणी तडजोड झाली. ग्रामपंचायत करवसुलीपैकी 18
लाख 75 हजार रुपये वसुली
झाली. विद्युत मंडळाचे 1 लाख 42 हजार, स्टेट बँकेचे 3 लाख 37
हजार, महाराष्ट्र बँकेचे 3 लाख 5क् हजार बँक ऑफ इंडियाचे 2क्
हजार अशी वसुली झाली. शनिवारी (दि.13) सकाळी सासवड न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
श्रीकृष्ण इनामदार यांच्या हस्ते व स. न्यायाधीश अरविंद पंडागळे
यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
उपाध्यक्ष तुषार मिरजकर, सचिव भारत बोरकर, गणोश उरणो, किरण फडतरे यांनी स्वागत केले. सासवड न्यायालयाचे सहायक अधीक्षक सूर्यकांत घोणो, आर. आर. कदम, वरिष्ठ लिपिक एन. आर. बोत्ने यांनी नियोजन केले. या वेळी तहसीलदार संजय पाटील, जेजुरीचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, नायब तहसीलदार सुनंदा पाटील, गावचे सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सरपंच उपस्थित होते. (वार्ताहर)
4या वेळी न्यायमूर्ती इनामदार यांनी जास्तीत जास्त लोकांनी खटले मिटवावेत, असे आवाहन केले. भावा- भावांचा वाद, बहीण-भावाचा वाद, कौटुंबिक वाद यामुळे आपले कुटुंब मागे राहाते. प्रगती होत नाही. म्हणून तडजोड करावी, असे आवाहन इनामदार यांनी केले. सह न्यायाधीश अरविंद पंडागळे, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष नाझीरकर यांनी प्रास्ताविक केले. पॅनेल जज म्हणून महेश बारटक्के, आशपाक बागवान, नवनाथ गायकवाड, सुरेश फडतरे, राहुल काळे, दिगंबर पोमण, प्रकाश खाडे, राणी यादव, कलाताई फडतरे, किरण फडतरे, बापूसाहेब गायकवाड, प्रशांत यादव, सतीश राणो यांनी काम पाहिले.