पुण्यात आरटीईतून दोन हजार आठशे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:26+5:302021-06-21T04:08:26+5:30

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश ...

Two thousand eight hundred admissions from RTE in Pune | पुण्यात आरटीईतून दोन हजार आठशे प्रवेश

पुण्यात आरटीईतून दोन हजार आठशे प्रवेश

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा राज्यातील ९ हजार ४३२ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली. आरटीई प्रवेशाच्या ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाख २२ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. कोरोनामुळे सुमारे दीड ते दोन महिने आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब झाला होता. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार सध्या शाळा स्तरावर कागदपत्र तपासणी विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश दिला जात आहे.

राज्यात आरटीई प्रवेशाच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४ हजार ७७३ जागा आहेत. या जागांसाठी तब्बल ५५ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील १४, ५६७ विद्यार्थ्यांची लॉटरीने प्रवेशासाठी निवड करण्यात आली. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील २ हजार ८०४ विद्यार्थ्यांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे.तर १५३ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

-------------

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तात्पुरते झालेले आरटीईचे प्रवेश

पुणे २,८०४,नागपूर १,०३२, ठाणे १,५३५ , अहमदनगर ५७२, जळगाव ८४०, मुंबई ५९१, नाशिक ७१७, पालघर ३००, रायगड ९०२, सातारा ३१५, सोलापूर ४१६, यवतमाळ २५६, वर्धा १९९

Web Title: Two thousand eight hundred admissions from RTE in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.