भरदिवसा लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

By Admin | Updated: June 9, 2014 04:51 IST2014-06-09T04:51:08+5:302014-06-09T04:51:08+5:30

समरहिल, कुणेगाव येथील सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चंद्रकांत अनंत माने (वय २०) व सुनील मल्हारी तलवारे (वय २०, दोघेही रा. या दोन अट्टल चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

Two stolen robbers arrested | भरदिवसा लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

भरदिवसा लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

लोणावळा : समरहिल, कुणेगाव येथील सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चंद्रकांत अनंत माने (वय २०) व सुनील मल्हारी तलवारे (वय २०, दोघेही रा. निराधारनगर, पिंपरी) या दोन अट्टल चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर भोसरी, चिंचवड, हिंजवडी, पिंपरी आदी पोलीस ठाण्यांत ४० हून अधिक गुन्हे नोंद असल्याची माहिती लोणावळा शहरच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने दिली़
चोरट्यांना चिंचवड पोलिसांनी चिंचवडमध्ये चोरी करताना पकडले होते़ त्यांची कोठडी संपताच त्यांना लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची कबुली दिली़ त्यांचा साथीदार कैलास अशोक खलसे (रा़ बौद्धनगर, पिंपरी) हा अद्याप फ रारी आहे़ या सर्वांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व अन्य ४० हून अधिक गुन्हे नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Two stolen robbers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.