शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोडाऊनला भगदाड पाडून चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे सख्खे भाऊ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:31 IST

वाघोली येथे डब्लूएस बेकर्स कारखान्याच्या पाठीमागील बाजूला असलेल्या गोडावूनच्या भिंतीला भगदाड पाडून ४० लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास करणाऱ्या टोळीचा लोणीकंद पोलिसांच्या डी बी पथकाने पर्दाफाश केला असून दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. टोळीतील इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहे.  

वाघोली: वाघोली येथे डब्लूएस बेकर्स कारखान्याच्या पाठीमागील बाजूला असलेल्या गोडावूनच्या भिंतीला भगदाड पाडून ४० लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास करणाऱ्या टोळीचा लोणीकंद पोलिसांच्या डी बी पथकाने पर्दाफाश केला असून दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. टोळीतील इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहे.  

      दीपक केवल दुबे (वय २२), अरुण केवल दुबे (वय २४, दोघेही रा. कारिवलीगाव, भिवंडी) असे गोडाऊनचोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील कावेरी हॉटेल समोर असणाऱ्या डब्लूएस बेकर्सच्या पाठीमागील बाजूस लाईफ केअर लॉजिस्टिकचे गोडावून आहे. यामध्ये पॅनासॉनिक कंपनीचे कॅमेरे, मिक्सर, हेअर ड्रायर अशा विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्या होत्या. सुट्टीमुळे बंद असलेल्या गोडावूनच्या भिंतीला चोरट्यांनी दोन फुटांचे भगदाड पाडून आतमध्ये ठेवलेल्या ४० लाख रुपये किमतीच्या २८ प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी दीपकसिंग राणा यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे.

      चोरीमध्ये गेलेल्या मोबाईलचा पोलिसांनी तपास केला असता भिवंडी येथून दोघांना डी बी पथकाने अटक केली. त्यांच्याकडे चोरीला गेलेल्या काही वस्तू देखील मिळाल्या आहेत. पोलिसांनी पर्दाफाश केलेली टोळी गोडाऊन फोडण्यामध्ये सराईत असून त्यांच्यावर भिवंडी येथे चार गोडाऊन फोडण्याचे गुन्हे देखील दाखल आहेत. हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील   यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके व, सुरेशकुमार राऊत (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने दोघांना अटक केले असून इतर फरार असलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक हनमंत पडळकर, पोलीस कर्मचारी श्रीमंत होनमाने, समीर पिलाणे, सुरज वळेकर वेताळ यांनी केली.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी