शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भिगवणजवळ दोन एसटी बसची धडक; अपघातात ४० पेक्षा अधिक प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 16:11 IST

चालकाचे प्रसंगावधान : बस पुलावरुन पाण्यात पडता पडता वाचली..  

ठळक मुद्देबऱ्याच प्रवाश्यांना या अपघातात डोक्याला,डोळ्यांना आणि छातीला मार

भिगवण : पुणे- सोलापूर महामार्गावरील भिगवण गावाच्या हद्दीत ठाणे उस्मानाबाद एसटी बसने पुणे नांदेड शिवशाही बसला धडक दिली. अपघातात ४० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटना गुरुवारी (दि.७) दुपारी २ वाजता घडली. प्रवाश्यांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे बस उजनीच्या पाण्यात पडता पडता वाचली,अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. भिगवण पासून ५०० मीटरवर हा अपघात घडला. अपघातात दोन्ही गाडीतील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पुणे सोलापूर महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला टेम्पो नादुरुस्त झाल्यामुळे उभा होता. महामार्ग प्रशासनाकडून याठिकाणी कोणताही सूचना फलक लावला नव्हता. त्याच वेळी एक इंडिका गाडी मुख्य रस्त्यावर थांबून दुसऱ्या वाहकाशी बोलत थांबला होता. दरम्यान सोलापूरकडे जाणाऱ्या शिवशाही बस क्र. (एमएच.१४ जीयु ०६४५ )या गाडीने ब्रेक लावण्याच्या प्रयत्नात कारला धडक दिली. पुण्याहून सोलापूरकडे त्याचवेळी जाणारी ठाणे उस्मानाबाद बस क्र. ( एमएच.१४ बी.टी.४५७६) ही शिवशाहीवर जोरात आदळली. बसमध्ये ६० प्रवासी होते. यातील बऱ्याच प्रवाश्यांना या अपघातात डोक्याला,डोळ्यांना आणि छातीला मार लागला. शिवशाही बस मधील प्रवाशांनाही मार लागला.अपघात झालेल्या ठिकाणी उजनीचा पूल आहे. सध्या त्याखाली मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. मात्र बस ड्रायव्हरचे प्रसंगावधान आणि प्रवाश्यांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे पुढील प्रसंग टळला. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी मदतीला पोलीस पथक पाठवून जखमींना भिगवण येथील खासगी दवाखान्यात पोहोचविण्याचे प्रयत्न केले. शासनाची १०८ क्रमांकाची अँब्युलन्स डॉ.राजन सोनवणे यांच्यासह काही वेळातच उपलब्ध झाल्याने जखमीना तातडीने मदत मिळाली. 

टॅग्स :BhigwanभिगवणAccidentअपघातShivshahiशिवशाही