शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मिलिटरी कॉलेजमध्ये पूल बांधणीच्या सरावादरम्यान दोन सैनिकांचा मृत्यू , ९ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 19:39 IST

युद्धनीतीच्या सरावाचा भाग असलेल्या पूल बांधणीची सुरु होती कसरत

ठळक मुद्देपुल उभारणीचा सुरू होता सराव

पुणे : दापोडी येथील मिलीटरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुल बांधणीच्या सरावादरम्यान अचानक पुल कोसळल्यामुळे दोन जवानांचा मृत्यू झाला तर ९ जवान गंभीर जखमी झाले आहेत. यात एका लष्करी अधिका-ाचा समावेश आहे. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. जखमींना खडकी येथील मिलीटरी हॉस्पिटल आणि पुण्यातील कमांड हॉस्पीटल येथे उपचारासाठी तातडीने हलवीण्यात आले आहे.लान्स हवालदार पी. के. संजीवन, नायक बी. के. वाघमोडे अशी या अपघातात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. तर जखमींची नावे कळू शकली नाहीत. युद्धात आलेले नैसर्गीक आणि कृत्रिम अडथळे दुर करण्यासाठी पुण्यातील कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग येथे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. गुरुवारी  पुल उभारणीचे प्रात्यक्षिके महाविद्यालयात सुरू होती. बेली ब्रीज नामक पुल उभारणीचे काम सुरू असतांना पुलाचा आधार देणारा टॉवर अचानक हलल्यामुळे पूल खाली कोसळला. यावेळी पुलाखाली जवळपास १० ते १२ जवान होते. या पुलाच्या मलब्याखाली अडकलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी तातडीने हालचाली करण्यात आला. लष्करी अधिकाऱ्यांनी पुलाचा राडारोडा बाजुला काढत खाली दबलेल्या जवानांना तातडीने बाहेर काढले.लान्स हवालदार पी. के. संजीवान, नायक बी. के. वाघमोडे या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ९ जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने  खडकी येथील मिलीटरी हॉस्पीटल आणि पुण्यातील कमांड हॉस्पीटल येथे तातडीने दाखल करण्यात आले. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू  आहे. यातील काही जनांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना या अपघाता बाबत कळवीण्यात आले आहेत. ही घटना कशी घडली या बाबत चौकशी समिती (कोर्ट ऑफ इन्कॉयरी)  स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्यावर या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती लष्कराच्या सुत्रांनी दिली....................पुल उभारणीचा सुरू होता सरावयुद्धामध्ये शत्रुप्रदेशात अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम अडथळे येत असतात. एखादी छोटी दरी तसेच नदी ओलांडण्यासाठी लष्कराच्या इंजिनिअरींग विभागातर्फे कृत्रीम पुलाची उभारणी करण्यात येते. या पुलाच्या माध्यमातून अडथळे पार करून वेगाने शत्रुप्रदेशात आत जाता  येते. गुरूवारी कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग येथे अशा प्रकारण्या पुल उभारणीचा सराव सुरू होता. बेली ब्रिज नामक पुल उभारण्यात येत असतांना या पुलाचा आधारस्तंभ अचानक कोसळल्यामुळे संपूर्ण पुल कोसळला. 

टॅग्स :dapodiदापोडीIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यू