चिंबळी फाटा येथे दोन दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:10 IST2021-03-15T04:10:50+5:302021-03-15T04:10:50+5:30

भैरवनाथ हार्डवेअर आणि किराणा जनरल स्टोअर्स अशी आग लागलेल्या दुकानांची नावे आहेत. अग्निशमन विभागाच्या गाडीला येण्यास विलंब लागल्याने ...

Two shops burnt at Chimbali Fata | चिंबळी फाटा येथे दोन दुकाने भस्मसात

चिंबळी फाटा येथे दोन दुकाने भस्मसात

भैरवनाथ हार्डवेअर आणि किराणा जनरल स्टोअर्स अशी आग लागलेल्या दुकानांची नावे आहेत. अग्निशमन विभागाच्या गाडीला येण्यास विलंब लागल्याने दुकानामधील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला होता. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या दोन्ही दुकानांना रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग पाहिल्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग विझवणे अवघड झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी अग्निशामक दलाला संपर्क करून बोलावले. अग्निशामन बंब आणि दोन टँकरनी आग आटोक्यात आणली. परंतु अग्निशमन गाडी येईपर्यंत हार्डवेअर दुकानातील सर्व सामान तसेच किराणा दुकानातील डी फ्रीज, साधे फ्रिज किराणा वस्तू आदी जळून खाक झाल्या. या आगीमध्ये भैरवनाथ हार्डवेअर या दुकानाचे सुमारे चौदा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

- शॉर्टसर्किटमुळे जळालेली दुकाने

Web Title: Two shops burnt at Chimbali Fata