शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे पुण्याचं कनेक्शन उघड; दोन मोठी नावं आली समोर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 13:17 IST

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहे.

पुणे: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची रविवारी २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती. 

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहे. सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यासाठी पुण्यातील दोन शूटर्सना पंजाबमध्ये बोलवण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणात ८ लोकांची छायाचित्रं समोर आली होती. त्यापैकी एकाला देहरादूनमधून पकडलं आहे. तर पुण्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ या दोन्ही आरोपींविरुद्ध लुकआऊटची नोटीस जारी करण्यात आली आहे. 

संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचरची त्याची सासुरवाडी आहे. संतोष जाधव हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले यांच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून तो फरार आहे. 

पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले (वय २४, रा. पांढरीमळा, मंचर) याचा १ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास  एकलहरे गावाजवळ खून करण्यात आला होता. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी बाणखेले याच्या डोक्यात २ गोळ्याघालून त्याचा खून केला होता. या गुन्ह्यात संतोष जाधव याचे नाव निष्पन्न झाले होते. संतोष जाधव याच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात मोक्का कारवाई केली आहे. त्यानंतर संतोष जाधव हा  पुणे परिसरातून दूर हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान भागात गेला असून तेथे त्याने गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे सांगितले जाते. राजस्थानमधील गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.

दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्याकडे खाजगी बुलेटप्रूफ वाहन होते, परंतु घटनेच्या वेळी त्यांनी ते सोबत घेतले नव्हते. मूसेवाला यांनी आपले घर सोडल्यानंतर समोरुन २ वाहने आली आणि त्यांनी मूसेवालांच्या गाडीवर अंदाधूंद गोळीबार केला. यादरम्यान २५-३० गोळ्या चालवण्यात आल्या. यातील अनेक गोळ्या मूसेवाला यांच्या शरीरीत घुसल्या. यानंतर रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPunjabपंजाबPuneपुणे