बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार
By Admin | Updated: June 30, 2015 22:56 IST2015-06-30T22:56:30+5:302015-06-30T22:56:30+5:30
राहूबेट (ता. दौंड) परिसरात बिबट्यासदृश प्राण्याचे जनावरांवरील हल्ले वाढतच चालले आहेत. सोमवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास देवकरवाडीनजीकच्या

बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार
पाटेठाण : राहूबेट (ता. दौंड) परिसरात बिबट्यासदृश प्राण्याचे जनावरांवरील हल्ले वाढतच चालले आहेत. सोमवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास देवकरवाडीनजीकच्या गणेशनगर वस्ती येथे दोन मेंढ्यांना या वन्य प्राण्याने ठार मारल्याची घटना घडली आहे. यामुळे या परिसरातील ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वन विभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरा लावून या प्राण्याला पकडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
राहूबेटात गेल्या काही महिन्यांपासून हा बिबट्यासदृश प्राणी रानावनातून मुक्तपणे संचार करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत त्याने टाकळी भीमा, वाळकी, दहीटणे, राहू येथील बागवस्ती, शिंदेनगर या ठिकाणी एकूण आत्तापर्यंत १० ते १५ शेळ्या व मेंढ्यांवर हल्ले चढवून त्यांचा फडशा पाडला आहे. सोमवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास मनोज शितोळे या शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्यात शिरून या बिबट्यासदृश प्राण्याने दोन मेंढ्या जागीच ठार मारल्या. वनरक्षक अधिकारी व्ही. एच. हिंगणे व शिपाई सुरेश पवार यांनी या ठिकाणी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. (वार्ताहर)