शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पोल्ट्रीची भिंत कोसळून दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी; कदमवाकवस्ती येथील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 19:30 IST

ही दुर्देवी घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली......

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती परिसरातील पांडवदंड येथे पोल्ट्रीची भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी पडली तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.२१) घडली. या अपघातात यश मयूर काळभोर, (वय- १४, रा. पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली) व प्रथमेश संदीप बोरुडे (मयूर वय- १५ रा. सदर मूळ रा.देवकर वस्ती वार्ड नंबर ७, श्रीरामपूर, अहमदनगर) अशी मृत्यू झालेल्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलांची नावे आहेत. तर भिंत पडत असल्याची जाणीव होताच भिंतीजवळ उभे असलेले यशचे वडील मयूर गजानन काळभोर व त्यांचा मित्र सुनील वसंत चव्हाण हे दोघेजण वेळीच बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचले.

ही दुर्देवी घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिंकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयूर काळभोर यांची पांडवदंड परिसरात जुनी पोल्ट्री होती. ही पोल्ट्री साफ करण्याचे काम मागील दोन दिवसांपासून सुरु होते. दोन दिवसांपूर्वी मयुर काळभोर यांनी पोल्ट्रीवरील पत्रे काढून ठेवले होते. तर गुरुवारी सकाळपासूनच मयूर काळभोर, सुनिल चव्हाण या दोघांसह यश व प्रथमेश हे चारजण पोल्ट्रीमधील साहित्य व जागेची साफसफाई करत होते. ही साफसफाई सुरु असतानाच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक भिंत कोसळल्याने या भिंतीच्या बाजूला उभे असलेले यश काळभोर व प्रथमेश बोरुडे हे त्या भिंतीखाली गाडले गेले. तर भिंत पडत असल्याचे लक्षाच आल्याने व लागलीच बाजूला झाल्याने मयूर काळभोर आणि सुनील चव्हाण हेदोघेजण भिंतीखाली जाण्यापासून वाचले. दरम्यान भिंतीखाली दोन मुले अडकल्याचे लक्षात येताच, मयूर काळभोर व त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तात्काळ भिंत हटविण्याचे काम सुरु केले.

भिंतीखाली गाडल्या गेलेल्या वरील दोन्ही मुलांना तत्काळ लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचेही निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेला यश काळभोर हा कदमवाकवस्ती येथील रायलकर हॉस्पीटल शेजारी असलेल्या टायग्रीस स्कूल या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. तर त्याचा मित्र प्रथमेश बोरुडे हा लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता. दोन्ही शाळकरी मुलांचा मृत्यू, तोही बापाच्या डोळ्यादेखत झाल्याने लोणी काळभोर व परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात