राजेश लाडवर पाटसला दोन खंडणीचे गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:23+5:302021-07-23T04:09:23+5:30

दौंड पंचायत समितीतील बांधकाम विभागातील शाखा आभियंता जितेंद्र शिंदे ( रा. दौंड ) यांना दहा लाखाची खंडणी मागीतली असल्याची ...

Two ransom charges filed against Rajesh Lad | राजेश लाडवर पाटसला दोन खंडणीचे गुन्हे दाखल

राजेश लाडवर पाटसला दोन खंडणीचे गुन्हे दाखल

दौंड पंचायत समितीतील बांधकाम विभागातील शाखा आभियंता जितेंद्र शिंदे ( रा. दौंड ) यांना दहा लाखाची खंडणी मागीतली असल्याची फिर्याद जितेंद्र शिंदे यांनी पाटस पोलीस चौकीत दिली आहे. यापूर्वी माझ्याकडून राजेश लाड याने वेळोवेळी एक लाख दहा हजार रुपये घेतले आहे दरम्यान मला मोबाईलवर धमकावत लाड म्हणाला की माझे तक्रारी अर्ज मागे घ्यायचे असेल तर तुम्हाला दहा लाख रुपये द्यावे लागतील असे फिर्यादीत म्हटले आहे.

पाटस येथील शेतकरी राजेंद्र घाडगे यांनी वीस हजाराची खंडणी प्रकरणी तक्रार केल्याने राजेश लाड याच्यावर बुधवार ( दि. २१) रोजी खंडणीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असल्याची माहीती सहाय्यक पोलीस ऊपनिरिक्षक बाळासाहेब पानसरे यांनी दिली.एकंदरितच पाटस येथील खंडणीच्या दोन्ही गुन्ह्यात राजेश लाड याला अटक करण्यात आली असल्याची माहीती पाटस पोलीसांनी दिली.

Web Title: Two ransom charges filed against Rajesh Lad