दोन पत्राशेड जमीनदोस्त
By Admin | Updated: December 27, 2014 05:14 IST2014-12-27T05:14:13+5:302014-12-27T05:14:13+5:30
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण पथकाने येथील सर्व्हे क्रमांक १७ मधील दहा हजार चौरस फूट व सर्व्हे क्रमांक २० मधील ७ हजार

दोन पत्राशेड जमीनदोस्त
रहाटणी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण पथकाने येथील सर्व्हे क्रमांक १७ मधील दहा हजार चौरस फूट व सर्व्हे क्रमांक २० मधील ७ हजार चौरस फुटांचे पत्राशेड कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात सर्व्हे क्रमांक १७ मधील विनोद जैन यांच्या मालकीची दहा हजार चौरस फूट नवीन पत्राशेड पाडण्यात आले. याच परिसरातील सर्व्हे क्रमांक २० मधील लिखमाराम सुतार यांच्या मालकीचे ७ हजार चौरस फूट नवीन पत्राशेड पाडण्यात आले.
हे दोन्ही पत्राशेड औंध-रावेत बीआरटी रस्त्यालगत आहेत. प्राधिकरणाचे उपअभियंता वसंत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ५ कर्मचारी, १० मजूर, जेसीबी, तसेच पोलीस उपनिरीक्षक आर. के. म्हाळसकर यांच्यासह १५ पोलीस कर्मचारी तैनात होते. (वार्ताहर)