दोन पोलिसांना लाच घेताना पकडले
By Admin | Updated: July 5, 2014 06:25 IST2014-07-05T06:25:39+5:302014-07-05T06:25:39+5:30
घोडेगाव येथे दोन पोलिसांना ३ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी पकडले.

दोन पोलिसांना लाच घेताना पकडले
घोडेगाव : घोडेगाव येथे दोन पोलिसांना ३ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी पकडले. शेतजमिनीचा रस्ता व सागाची झाडे यांवरून दोन भावांमध्ये असलेल्या वादाप्रकरणी कारवाई करू नये, म्हणून ३ हजार रुपयांची लाच घेताना हवालदार एस. व्ही. शिरपाई व लाच मागितल्याप्रकरणी सहआरोपी म्हणून पी. एस. ताकवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
याबाबत चास येथील फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार दुपारी ३.२० वाजता पोलीस हवालदार एस. व्ही. शिरसाट यांना ३ हजार रुपये लाच घेताना पकडले. (वार्ताहर)