हवेली पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST2021-09-22T04:13:16+5:302021-09-22T04:13:16+5:30

पुणे : अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवेली पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक ...

Two police personnel from Haveli police station caught taking bribe | हवेली पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

हवेली पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

पुणे : अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवेली पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीपती माणिक कोलते (५५) आणि पोलीस नाईक शिवाजी बाळासाहेब जगताप (३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्यावर हवेली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आवश्यक ती मदत करण्यासाठी कोलते याने तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपतने २६ ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यावेळी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलीस चौकीसमोर मंगळवारी सापळा रचण्यात आला. कोलते यांच्यावतीने जगताप याला १० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Two police personnel from Haveli police station caught taking bribe