शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट आवारात तंबाखू खाऊन थुंकणे दोन पोलिसांना पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 13:45 IST

न्यायालयाने ठोठावला दंड..

ठळक मुद्देपोलीस उपआयुक्तांनी कारवाई करून अहवाल द्यावायेत्या १५ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश

पुणे : न्यायालयाच्या आवारात थुंकणाºया व्यक्तींवर कायदेशीर दंड करून त्यांना अद्दल घडविणाºया पुणे जिल्हा न्यायालयाने आता पोलिसांचे देखील कान उपटले आहेत. गुरुवारी न्यायालयाच्या आवारात दोन पोलीस कर्मचारी तंबाखू खाऊन थुंकताना आढळले. त्यांच्यावर कारवाई करुन ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने पोलीस उपआयुक्तांना १५ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आवारात तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई करणार, असे पत्रक जिल्हा न्यायालयाने काढले होते. त्यानुसार अनेकांवर कारवाई देखील करण्यात आली. गुरुवारी पुणे बार असोसिएशनच्या कार्यकरिणीची निवडणूक असताना तिथे हजर असलेल्या दोन पोलीस हवालदारांनी नियमांचे उल्लंघन केले. मतदान केंद्रावर एक पोलीस हवालदार थुंकत असल्याचे  अ‍ॅड. विकास शिंदे, अ‍ॅड. राहुल वंजारी, अ‍ॅड. प्रतीक जगताप यांच्या लक्षात आले. याप्रसंगी शिंदे यांनी संबंधित पोलीस हवालदाराचे थुंकताना चित्रीकरण केले. यानंतर   नवीन इमारतीच्या दुसºया मजल्यावरील मा. एस. बी. पाटील (एसी कोर्ट) साहेबांच्या न्यायालयाबाहेर अ‍ॅड. शिंदे व अ‍ॅड. ढवळे थांबले असताना शेजारील खिडकीजवळ त्याच कोर्टातील एका पोलीस हवालदाराने तंबाखू तोंडात टाकली आणि काही वेळाने खिडकीत थुंकून टाकली. याचेही सर्व चित्रीकरण करण्यात आले आहे.   पुढे हा सर्व प्रकार अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर साहेब यांच्याकडे अ‍ॅड. शिंदे यांनी लेखी तक्रार करून निदर्शनास आणून दिला. यावर जिल्हा न्यायधीशांंनी कोर्टाच्या आवारात अस्वच्छता करणाऱ्या त्या दोन पोलीस हवालदारांची चौकशी करून त्यांच्यावर येत्या १५ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश पोलीस उपआयुक्तांना दिले आहेत...........कोर्टात स्वच्छता  ठेवावी याची जबाबदारी केवळ वकिलांची नव्हे तर सर्वांची आहे. यापूर्वी नागरिकांना स्वच्छता राखावी यासाठी आवाहन करण्यात आले. त्यांनी नियमांचे उल्लंघन करण्यास सुरुवात केल्यानंतर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात आली. मात्र, ज्यांच्याकडून कायद्याची अंमलबजावणी केली जाते, त्यांच्याकडूनच नियम धाब्यावर बसवले जात असल्यास ही गंभीर बाब आहे. संबंधित पोलीस हवालदारांची वर्तणूक बेजबाबदार म्हणावी लागेल. - अ‍ॅड. विकास शिंदे 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिस