शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे ; चार काडतूसे जप्त;  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:22 IST

शिरूर तालुक्यातील गुणोरे परिसरात सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिघोज व पारनेर पोलिसांची कामगिरी, सदोष मनुष्यवधाचा तसेच अवैध शस्रे बाळगण्याचा गुन्हा दाखल

टाकळीहाजी :  शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारनेर तालुक्यातील गुणोरे परिसरात प्रताप मंजाबा साळुंखे या इसमाकडून दोन गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहे. या कामी निघोज दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार अशोक निकम व शिवाजी कावडे यांनी कोहकडी येथील ग्रामस्थांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली आहे.पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, साळुंखे हा दुचाकीवर गुणोरे परिसरातून प्रवास करत असताना समोरून येणाºया रतिराम बाबुराव डेरंगे (रा. कूरूंद) या व्यक्तीला दुचाकीवरून धडक दिली. त्यावेळी पलायन करण्याचा प्रयत्नात असतानाच या अपघाताची माहिती निघोज पोलिसांना मिळाली. हवालदार निकम व पोलीस कर्मचारी शिवाजी कावडे यांनी दुचाकीवर साळुंखे याचा पाठलाग केला. यावेळी कोहकडी येथील ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. साळुंखे यास हमालवाडी येथे पकडले. त्याच्याकडून  १ गावठी कट्टा व काडतूसे अशा वस्तू हस्तगत केल्या व त्यास ताब्यात घेतले.  पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना माहिती मिळाल्यानंतर ते निघोज व पारनेर पोलिसांनी साळुंखे याची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आणखी एक गावठी कट्टा झाडीत फेकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेच त्याला बरोबर घेऊन शोध घेतला. त्यावेळी एक कट्टा व काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांनी साळुंखे याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा तसेच गुन्ह्यासाठी अवैध शस्रे बाळगण्याचा गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :ShirurशिरुरParnerपारनेरCrimeगुन्हाPoliceपोलिस