शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईतांना प्रॉपर्टी सेलने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 18:26 IST

दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरांस प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (वय ३१) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देआरोपींनी पुणे शहर व परिसरात एकूण ५२ घरफोडीचे गुन्हे केले असून दिली कबुलीएकूण ४६ लाख ५८ हजार ७४० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरांस प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (वय ३१, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपींनी पुणे शहर व परिसरात एकूण ५२ घरफोडीचे गुन्हे केले असून त्याची कबुली दिली आहे. त्यांनी केलेल्या घरफोड्यांमधील एकूण ४५ लाख ८ हजार रुपयांचे १६१ तोळे सोन्याचे दागिने, २० हजार ७४० रोख रक्कम, ३० हजार रुपये किंमतीचे मोबाईल, लॅपटॉप, गुन्ह्यात वापरलेली २ दुचाकी वाहने ज्याची किंमत १ लाख तर घरफोडी करण्याचे साहित्य असा एकूण ४६ लाख ५८ हजार ७४० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक इजाज शिलेदार, पोलीस हवालदार अनिल उसुलकर, अमोल भोसले, यशवंत खंदारे, दिनकर भुजबळ, सुभाष कुंभार, दत्ता गरुड, संजय जगताप, संजय सुर्वे, संभाजी गायकवाड, अनिल शिंदे, निजाम तांबोळी, संजय ढोले यांनी केली.  

टॅग्स :PuneपुणेRashmi Shuklaरश्मी शुक्ला