घरफोडी करणा-या सराईत चोराला अटक, २१ लाखांचे सोने हस्तगत : पनवेल पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 02:56 AM2017-12-23T02:56:35+5:302017-12-23T02:56:54+5:30

काही महिन्यांपूर्वी पनवेल शहर आणि परिसरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घरफोड्या करणा-या सराईत चोराला शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २१ लाख रु पये किमतीचे ७० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

 Panvel police arrested for robbery, robbed of Rs 21 lakhs, arrested for burglary | घरफोडी करणा-या सराईत चोराला अटक, २१ लाखांचे सोने हस्तगत : पनवेल पोलिसांची कारवाई

घरफोडी करणा-या सराईत चोराला अटक, २१ लाखांचे सोने हस्तगत : पनवेल पोलिसांची कारवाई

Next

पनवेल : काही महिन्यांपूर्वी पनवेल शहर आणि परिसरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घरफोड्या करणा-या सराईत चोराला शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २१ लाख रु पये किमतीचे ७० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.   
पनवेल चिंचपाडा येथील संतोष परदेशी यांच्या घराचे खिडकीचे ग्रील तोडून चोरट्याने १ लाख ३५ हजार रु पये किमतीचे दागिने व रोख रकमेची चोरी केली होती. या चोºयांमध्ये हातखंडा असलेल्या सरमन उर्फ श्रावण रामदेव राजभर याला पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लालगंज, अजमगढ (उत्तरप्रदेश) येथून अटक केली आहे. त्याच्याकडून आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपीवर जवळपास २०हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. २०१३मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला क्र ाइम ब्रँचकडून अटक झाली होती. एप्रिल महिन्यात जेलमधून बाहेर आल्यानंतर तो गावी गेला व गावावरून परत आल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडी करण्यास सुरु वात केली. दरम्यानच्या काळात श्रावण राजभर हा आरोपी चेंबूर, टिळकनगर येथे राहत असे. चोरी करताना तो कोणतेही वाहन वापरत नसे. पायी एखाद्या गावात जायचा व तेथील खिडकी लोखंडी सळीने उघडून घरफोडी करण्यात या चोरट्याचा हातखंडा होता. पनवेल परिसरातील पारगाव, खारघर, कामोठे, न्हावाशेवा आदी भागांत या चोरट्याने चोºया केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोराकडून पोलिसांनी आतापर्यंत २१ लाख किमतीचे ७०० ग्रॅम सोने हस्तगत के ले आहे.

Web Title:  Panvel police arrested for robbery, robbed of Rs 21 lakhs, arrested for burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.