रोटरीतर्फे रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:09 IST2021-06-21T04:09:35+5:302021-06-21T04:09:35+5:30

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष अंबादास वामन यांनी दिली. ...

Two oxygen concentrators to the hospital by Rotary | रोटरीतर्फे रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

रोटरीतर्फे रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष अंबादास वामन यांनी दिली. रोटरीचे मेडिकल डिस्ट्रिक झोनल

डायरेक्टर डॉ. पंजाबराव कथे यांनी

कोविडमध्ये रोटरी क्लब मार्फत सर्वतोपरी मदत करून संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेबाबत कशी काळजी घ्यावी? याबाबत मार्गदर्शन केले. शिवनेरभूषण डॉ. सदानंद राऊत यांनी पोस्ट कोविडविषयी मार्गदर्शन केले. मिळालेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग गरजू-गरीब रुग्णांना करता येईल, असे सांगितले. रामभाऊ सातपुते व अंबादास वामन यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास डॉ.पल्लवी राऊत, डॉ. श्रीकांत फुलसुंदर, नंदकुमार चिंचकर, सुकाजी मुळे, रामभाऊ सातपुते इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेक्रेटरी डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी केले, तर आभार डॉ. शिवाजी टाकळकर यांनी मानले.

Web Title: Two oxygen concentrators to the hospital by Rotary