शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 20:20 IST

येत्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकांची वाट पाहावी लागणार नाही.

ठळक मुद्दे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘झेस्ट-२०’ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटनपुढील ५-१० वर्षात आपला खेळ जागतिक पातळीवर वेगळ्या उंचीवर

पुणे : ऑलिम्पिकच्या पहिल्याच पात्रता फेरीमध्ये चार भारतीय कुस्तीपटू पात्र ठरले आहेत. अजून तीन फेऱ्या असल्याने आणखी कुस्तीपटूंची निवड होईल. त्यामुळे येत्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकांची वाट पाहावी लागणार नाही. किमान दोन-तीन पदके कुस्तीतूनच मिळतील, असा विश्वास कुस्तीपटू गीता फोगाट यांनी व्यक्त केला.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘झेस्ट-२०’ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गुरूवारी फोगाट यांच्या हस्ते झाले. तत्पुर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जागतिक पातळीवर कुस्तीपटूंसह अन्य खेळाडूंचा आत्मविश्वास वाढू लागला असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, प्रत्येक खेळाडूचे लक्ष्य ऑलिम्पिक असते. त्यादृष्टीने खेळाडू प्रयत्न करत असतात. आता त्यांना सरकारचीही साथ मिळू लागली आहे. ऑलिम्पिकच्या पहिल्याच पात्रता फेरीत चार कुस्तीपटू निवडले गेले आहेत. पुढील फेऱ्यांमध्ये आणखी काही जणांची निवड होईल. प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदकांची वाट पाहावी लागते. पण यावेळी कुस्तीपटू निराशा करणार नाहीत. सध्या ते ज्यापध्दतीने खेळत आहेत, त्यावरून पदकांची अपेक्षा आणखी उंचावली आहे. खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमुळे खेळाडूंना व्यासपीठ मिळू लागले आहे. मी खेळायला सुरूवात केली तेव्हा शाळा किंवा जिल्हा स्तरापर्यंत स्पर्धा होत होत्या. पण आता राज्य, राष्ट्रीय पातळीवर संधी मिळू लागली आहे. त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. खेळांविषयी लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पुर्वी खेळाडूंपर्यंत निधी पोहचत नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. सध्या पुरेसा निधी मिळत नसला तरी हरयाणा सरकारप्रमाणे सर्व राज्य सरकारांनी खेळाडूंसाठी विविध योजना तयार करायला हव्यात. ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये खुप क्षमता आहे. त्यामुळे या भागात प्राधान्याने सुविधा निर्माण करून देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. ही स्थिती आणखी सुधारून पुढील ५-१० वर्षात आपला खेळ जागतिक पातळीवर वेगळ्या उंचीवर पोहचेल, असे फोगाट यांनी सांगितले. ------

टॅग्स :PuneपुणेOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Wrestlingकुस्ती