शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मंचरच्या रस्त्यावर बिबट जोडीचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 18:23 IST

वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबटे जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील शेतकरी नागरिक बिबट्याच्या वाढत्या संख्येने भयभीत झाले असतानाच शनिवारी रात्री मंचर शहरालगत असलेल्या जुन्या चांडोली रस्त्यावर बिबट नर- मादी फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने तात्काळ पिंजरा बसवून या नरमादीला जेरबंद करावे अशी मागणी राहुल थोरात यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्यात मागील आठ ते दहा वर्षांपासून मंचरपासून पूर्व भागात सर्वच गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. शेतकऱ्यांना रात्रीचे शेतीला पाणी देण्यास मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. काल पहाटे १ वाजून ३८ मिनिटांनी मंचर शहरानजीक असलेल्या थोरात मळ्यात, जुना चांडोली रस्त्यावर धनश्री थोरात व राहुल थोरात व माजी सैनिक रवींद्र थोरात यांना रात्री कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर भुंकण्याचा आवाज येऊ लागल्याने ते बाहेर येऊन पाहिल्यावर त्यांना दोन बिबटे घराभोवती फिरत असल्याचे निदर्शनास आले. या बिबट्यांचे फिरणे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर याच परिसरात जुना चांडोली रस्त्यावर नोव्हेंबर २०२२ मध्ये बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. १८ नोव्हेंबर व एक डिसेंबर २०२२ यादरम्यान एकूण दोन बिबटे या परिसरातून जेरबंद करण्यात आले होते. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर येथील स्थानिक नागरिक, शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र पुन्हा या परिसरात बिबटे मुक्तपणे संचार करत असल्याचे दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबटे जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरleopardबिबट्याforest departmentवनविभाग