शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात दाेन बिबट्या पडले कोरड्या टाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 20:37 IST

गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथील नगर-कल्याण रोडजवळील विटभट्टी जवळील पोल्ट्रीच्या कोरड्या पाण्याच्या टाकीत पाण्याच्या तसेच भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबट्याचे बछडे पडले.

बेल्हा : गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथील नगर-कल्याण रोडजवळील विटभट्टी जवळील पोल्ट्रीच्या कोरड्या पाण्याच्या टाकीत पाण्याच्या तसेच भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबट्याचे बछडे पडले. घटनास्थळी वनविभाग तसेच बिबट्या निवारा केंद्राचे पथक पोहचले आहे. हे बिबटे लहान असल्याने त्यांना त्यांच्या आईजवळ सोडण्यासाठी टाकीत शिडी लावण्यात आली असून या बिबट्यावर हे पथक लक्ष ठेवणार आहेत. या बाबतची माहिती अशी की गुळूंचवाडी हद्दीत बबु पठाण यांची पोल्ट्री आहे. या पोल्ट्री लगतच एक खोल पाण्याची टाकी आहे. पण ही टाकी सध्या कोरडी आहे. काल रात्री पाणी पिण्यासाठी किंवा भक्ष पकडण्यासाठी हे दोन बछडे जोरात धावले असता त्या कोरड्या पाण्याच्या टाकीत हे दोन बछडे पडले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी पोल्ट्रीचे कामगार येथील रस्त्याने चालले असताना त्यांना अचानक या टाकीतुन गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना पाण्याच्या टाकीत दोन बिबट्याचे बछडे पडलेले दिसले. त्यांनी ताबडतोप वनखात्याच्या कर्मचा-यांना ही माहिती दिली. या ठिकाणी वनपाल डी.डी.फापाळे, वनरक्षक जे.टी.भंडलकर, आनंदा गुंजाळ यांनी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

 हे एक ते दीड वर्षाचे दोन बछडे आहेत. त्यामध्ये एक नर व एक मादी असुन त्यांची आई या परिसरातच असण्याची शक्यता वनखात्याकडुन वर्तवण्यात येत आहे. ही कोरडी पाण्याची टाकी १५ ते २० फुट खोल आहे. त्यानंतर या ठिकाणी जुन्नरचे उपवनसंरक्षक जयराम गौडा, वनपरिक्षक अधिकारी बी. सी. येळे, डॉ. अजय देशमुख व रेस्क्यु टिमचे सदस्य या ठिकाणी हजर होते. या बछड्यांना शिडीच्या सहाय्याने वर काढण्यात येणार असुन त्यांना पुन्हा जंगलात त्यांच्या आईकडे सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पहाणा-यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. 

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणेWaterपाणी