दोन अपघातात दोघे ठार; एक जखमी
By Admin | Updated: December 13, 2015 23:55 IST2015-12-13T23:55:54+5:302015-12-13T23:55:54+5:30
नीरा-बारामती मार्गावर शनिवारी (दि. १२) रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकींचा अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. एक जण जखमी झाला आहे.

दोन अपघातात दोघे ठार; एक जखमी
वडगाव निंबाळकर : नीरा-बारामती मार्गावर शनिवारी (दि. १२) रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकींचा अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. एक जण जखमी झाला आहे.
सोरटेवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात गोविंद चंद्रकांत चव्हाण (वय २७) यांचा मृत्यू झाला आहे. सहप्रवासी सुनील दामलाल चव्हाण (वय २०) हे जखमी झाले आहेत.
दोघेही कर्नाटक राज्यातील आहेत. सध्या ते वडगाव निंबाळकर येथे राहत होते. नीरेकडून बारामतीच्या दिशेने दुचाकी
(एमएच १२/डीडी ५८७७) वरून चालले होते.
सोरटेवाडी येथे दुचाकीला अपघात झाला. याबाबत प्रमोद सुभाष राठोड (रा. कर्नाटक, सध्या रा. वडगाव निंबाळकर) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खबर दिली.
सदोबाचीवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला झाडाला दुचाकी (एमएच २३/एएस ५४२०) धडकून अपघात झाला. यामध्ये बंडू लिंबा चव्हाण (वय ४२, रा. गेवराई, जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मारुती किसन राठोड यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खबर दिली.