बोलत असताना मोबाइल चोरून नेण्याच्या दोन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:57+5:302021-09-06T04:14:57+5:30
याप्रकरणी विमाननगरमध्ये राहणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणीने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही तरुणी विमाननगरमधील मलाबार हॉटेलच्या समोरून भावाबरोबर चालत ...

बोलत असताना मोबाइल चोरून नेण्याच्या दोन घटना
याप्रकरणी विमाननगरमध्ये राहणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणीने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही तरुणी विमाननगरमधील मलाबार हॉटेलच्या समोरून भावाबरोबर चालत जात होती. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने तिच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.
दुसरी घटना फिनिक्स मॉलच्या पाठीमागील रोडवर घडली. खराडी येथील सावत कॉम्पलेक्स येथे राहणारा एक ३० वर्षांचा तरुण फिनिक्स मॉलच्या पाठीमागील रोडवर पार्किंगच्या समोरून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पायी घरी जात होता. तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला.
शहरात जबरदस्तीने मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून मोबाइल चोरीच्या घटनांची स्वतंत्र माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये १८ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या होत्या. यंदा ऑगस्ट २०२१ मध्ये मोबाइल चोरीचे ६८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.