शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचे आभार मानणारी पुण्यातून दोनशे पत्र; बहुतांश पत्रातून मोदींच्या कामाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 12:22 IST

जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी केल्याबद्दल मोदी (Narendra Modi) यांना या पत्रांतून धन्यवाद देण्यात आले आहेत

पुणे : कोरोना काळात मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाल्यावर योजनांचा लाभही भारतीयांना मिळाला. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या गोखलेनगर भागातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे (Narendra Modi) आभार मानणारी दोनशे पत्र त्यांना पाठवली आहेत.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्या हस्ते पत्रं पोस्टात टाकण्यात आली. त्याप्रसंगी संयोजक पुणे शहर उपाध्यक्ष योगेश बाचल, शिवाजीनगर अध्यक्ष सतिश बहिरट, प्रभागध्यक्ष लक्ष्मण(अण्णा) नलावडे, नगरसेवक प्रभाकर पवार, किरण ओरसे, रोहीत लिंबोळे, रामु धनगर, रमेश भंडारी, सर्जेराव धोत्रे, स्नेहल ढावरे, युवराज गाटे, रवी जाधव, ईश्वर बनपट्टे, शैलेश चलवादी  उपस्थित होते. 

बहुतांश पत्रांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच मोफत अन्नधान्य वितरण, घरोघरी जाऊन लसीकरण, आणि महिलांच्या नावाने जनधनच्या खात्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याबद्दल मोदी यांना या पत्रांतून धन्यवाद देण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज या पत्रांतून व्यक्त करण्यात आली आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भाजपच्या समर्थकांशिवाय काही सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. 

लसीकरणाची मोहीम आणखी वेगवान करावी लागणार 

देशात कोरोना संसर्ग कमी होऊ लागला आहे. त्याच बरोबरीला लसीकरणाचा वेग वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारतात आतापर्यंत 30% लोकांनी (29.1 कोटी) लशीचे दोन डोस घेतले आहेत, तसंच 70.7 कोटी लोकांना पहिला डोस मिळाला आहे. 2021 च्या शेवटापर्यंत संपूर्ण लोकसंख्येला लस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते त्यासाठी लसीकरणाची मोहीम आणखी वेगवान करावी लागणार आहे. 100 कोटी डोस देणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. चीनने हा टप्पा जून महिन्यात पूर्ण केला होता. 278 दिवसात हा टप्पा पूर्ण केला याचा अर्थ देशात रोज 30 लाख डोस दिले जातात. मात्र जानेवारीपासून हा आकडा कमी जास्त होत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार