रवींद्र तुकाराम माळवदे (वय २०, रा. माळवदेवस्ती, कवठे यमाई) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर बाबाजी विट्ठल बगाटे, योगिता रवींद्र माळवदे, बबुबाई मथू माळवदे, मथू खंडू माळवदे, आकाश बाबूराव माळवदे, शोभा बाबाजी बगाटे, तुकाराम खंडू माळवदे हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील पाच जणांना अटक करण्यात आले. पांडुरंग बारकु माळवदे, बाबूराव दत्तू माळवदे, फक्कड दत्तू माळवदे, अभिजित फक्कड माळवदे, लहू बाबूराव माळवदे, अकुंश बाबूराव माळवदे, शोभा फक्कड माळवदे, सुदाम लक्ष्मण माळवदे, ताईबाई लक्ष्मण माळवदे, पाटील लक्ष्मण माळवदे, वर्षा पाटील माळवदे, हिराबाई बारकू माळवदे, बारकू दत्तू माळवदे (सर्व रा. माळवदेवस्ती, कवठे येमाई. ता. शिरूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:09 IST