शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भाईगिरीतून दोन गटांत तुफान हाणामारी, १० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 04:02 IST

दादा कोण, या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांनी एकमेकांवर पिस्तुले रोखण्याचा प्रकार मंगळवार पेठेत सोमवारी रात्री घडला़ याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोन्ही गटांतील १० जणांना अटक केली आहे.

पुणे  - दादा कोण, या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांनी एकमेकांवर पिस्तुले रोखण्याचा प्रकार मंगळवार पेठेत सोमवारी रात्री घडला़ याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोन्ही गटांतील १० जणांना अटक केली आहे.याप्रकरणी तन्वीर शेख (वय २८, रा. ताडीवाला रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ३५, रा़ नाना पेठ), तुषार अंकुश कदम (वय २४), बंटी संजय दाभेकर (वय १८, दोघे रा़ आंबेगाव पठार), विरेश भीमाशंकर कुंभार (वय ३३), शाकीब फारूक शेख (वय २१, दोघे रा़ नाना पेठ), प्रशांत ज्ञानदेव आल्हाटे (वय ३६, रा़ हडपसर) या ६ जणांना अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ गायकवाड आणि तन्वीर शेख या दोघांमध्ये वाद आहेत. तन्वीर शेख आणि त्याचे मित्र मंगळवार पेठेतील खड्डा गॅरेज चौकात सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास उभे होते. तेव्हा गायकवाड आणि त्याचे साथीदार पुणे स्टेशन येथे चहा पिण्यासाठी तेथून जात होते. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. आम्ही इथले दादा आहोत. या कारणावरुन ही भांडणे सुरू केली. त्यावेळी गायकवाडने त्याच्याकडील पिस्तुल गौस शेखवर रोखले. त्यानंतर गौसने त्याचे पिस्तुल गायकवाडवर रोखले. त्यामुळे तणाव निर्माण झाला आणि दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांना उलटे कोयते आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात काही जण जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दहा जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.सोमनाथ गायकवाड (वय ३५, रा. नाना पेठ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तन्वीर शेख (वय २८), इम्तियाज नवाब शेख (वय ३२), शाहरूख अब्दुल शेख (वय २३, दोघे रा़ गुलटेकडी), आफ्रिदी उर्फ शफी मुस्ताफा शेख (वय ४५, रा़ मोमीनपुरा, गंज पेठ) या चौघांना अटक केली आहे. गौस शेख, मोसीन सय्यद, जुगनू कुरेशी यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे