खुनाच्या प्रयत्नात फरारी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:09 IST2021-06-28T04:09:30+5:302021-06-28T04:09:30+5:30

पुणे : शहरातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा खुनाचा प्रयत करून मागील अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या दोघांना ...

Two fugitives arrested in attempted murder | खुनाच्या प्रयत्नात फरारी दोघांना अटक

खुनाच्या प्रयत्नात फरारी दोघांना अटक

पुणे : शहरातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा खुनाचा प्रयत करून मागील अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. आदित्य राहुल चव्हाण (वय १९) आणि अक्षय रमेश नवले (वय २०, दोघेही रा.जनता वसाहत, पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लोणीकंद पोलीस गस्त घालत असताना दत्तवाडी गुन्ह्यातील दोघे आरोपी उबाळेनगर परिसरात असल्याची माहिती पोलीस नाईक कैलास साळुंखे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे यांच्या पथकाने सापळा रचून आदित्य आणि अक्षय याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी अक्षय याने मार्केट यार्ड परिसरात जबरी चोरी केल्याची उघडकीस आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, मोहन वाळके, कैलास साळुंके, अजित फरांदे ,विनायक साळवे , समीर पिलाने, सागर कडू, बाळासाहेब तनपुरे यांनी केली.

Web Title: Two fugitives arrested in attempted murder