पुणे : खरेदीच्या बहाण्याने येऊन सराफी दुकानामधून साडेचार लाखांच्या हिऱ्याच्या २ बांगड्या लंपास केल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी दोन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी गोव्यामधून या दोघांना ताब्यात घेतले असून संपूर्ण ऐवज हस्तगत केला आहे. ही घटना २० मार्च रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास सेंटर स्ट्रीट रस्त्यावरच्या उत्कर्ष जेम्स अँड ज्वेलर्स दुकानात घडली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेण्यात आला. सॅन्डीजे गिवी मालूक (वय ५३, रा. जॉर्डन), सिमोनी कॉक्सईडीज (वय ३५, रा. जॉर्डन) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उत्कर्ष श्रॉफ (वय ३५, रा. लुल्लानगर, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. श्रॉफ यांचे लष्कर भागात दुकान आहे. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. त्याआधारे तपास करीत पोलीस पथक गोव्यात दाखल झाले. पणजीमध्ये मालूक आणि सिमोनी या दोघांना अटक करण्यात आली.
दोन विदेशी नागरिक अटकेत
By admin | Updated: March 31, 2017 03:28 IST