कात्रजमधील दोन अपघातांत दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: February 14, 2017 02:14 IST2017-02-14T02:14:33+5:302017-02-14T02:14:33+5:30
शहरात झालेल्या विविध अपघातांमध्ये दोन जणांना प्राण गमवावे लागले असून, त्यामध्ये कात्रज येथे दोन तर रामटेकडी येथे एक अपघात

कात्रजमधील दोन अपघातांत दोघांचा मृत्यू
पुणे : शहरात झालेल्या विविध अपघातांमध्ये दोन जणांना प्राण गमवावे लागले असून, त्यामध्ये कात्रज येथे दोन तर रामटेकडी येथे एक अपघात घडला आहे. रामटेकडीजवळ बीआरटी मार्गात झालेल्या अपघातात सुदैवाने तरुण बचावला. मात्र, तो गंभीर जखमी झाला आहे. तर, कात्रजमध्ये झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मित्रासह जात असलेल्या एका तरुणीचा समावेश आहे.
अंकिता देवराम लोहोटे (वय २२, रा. सध्या रा. नऱ्हे, मूळ रा. संगमनेर, अहमदनगर) या तरुणीचा कात्रज बाह्यवळण मार्गावर मृत्यू झाला. तर, तिचा सहप्रवासी हेरंब उत्तरवाड हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता ही हेरंबसोबत दुचाकीवरून जात होती. त्या वेळी आणखी एका दुचाकीवर तिचा मित्र विकास व मैत्रीण होती. रात्री पावणेबाराच्या सुमारास ते बाह्यवळण रस्त्याने ते जात होते. आंबेगाव भागातील पेट्रोलपंपावर जात असताना पोदार स्कूलजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. फिर्यादी विकास अंबेसंगे (वय २५) याने पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंकिताचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.