शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याला 'अशा'प्रकारे मिळाले दोन दिवसांनंतर जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 20:08 IST

प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका करुन त्याचा जीव वाचवण्यात पुणेकर दाम्पत्याला मिळाले यश..

ठळक मुद्देपंडोल यांच्या दोन दिवसांच्या प्रयत्नाला यश, मुक्त होताच कुत्र्यानं ठोकली धूम.

पांडुरंग मरगजे-पुणे : माणूस एखाद्या संकटात सापडला तर त्याला व्यक्त होता येते. पण एखादा मुका जीव अशा संकटात सापडला तर त्याची किती हाल होते याचा विचार न केलेलाच बरा आहे. पण या मुक्या जीवांच्या वेदना समजणारे काही व्यक्ती समाजात आहे. याचाच प्रत्यय देणारी घटना पुण्यात घडली. प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका करुन त्याचा जीव वाचवण्यात पुण्यातील पंडोल दापत्यांना अखेर यश मिळाले आहे. सुटका होताच सुटकेचा निश्वास टाकत कुत्र्याने धुम ठोकली.

पुण्यातील फिरोज पंडोल व प्रतिमा पंडोल दाम्पत्य कामानिमित्त सासवड ला गेले होते. दरम्यान सासवड बस स्थानका समोर बुधवारी रात्री एक कुत्र्याचे तोंड प्लॅस्टिक बाटलीत अडकले असल्याची माहिती फिरोज पंडोल यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या ठिकाणी पंडोल यांनी बराच शोध घेतला मात्र त्यांना कुत्रा काही सापडला नाही. हताश होत पंडोल यांना परत फिरावे लागले. दोन दिवस या घटनेचा विचार त्यांच्या मनात सुरू असतानाच शुक्रवारी (दि.१८) सकाळी सासवड बस स्थानकासमोर सदर कुत्रा असल्याची माहिती पंडोल यांना मिळाले. क्षणाचा हि विलंब न करता पंडोल यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेदरलेल्या कुत्राला पकडण्याचे मोठं आव्हान पंडोल यांच्या समोर होते.

बुधवारी रात्री पासून शुक्रवारी सकाळी पर्यंत कुत्र्याचे तोंड त्या प्लॅस्टिक बाटलीत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंडोल यांनी चपळाईने कुत्र्यावर झेप घेत त्याला पकडले. अतिशय हुशारीने कटरच्या साह्याने प्लॅस्टिकची बाटली कापून कुत्र्याचे तोंड बाहेर काढले व सुखरुप त्याची सुखरूप सुटका केली.

दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर कुत्र्याची सुटका करण्यात पंडोल यांना यश मिळाले मात्र अजून काही वेळ घेला असता तर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असता. मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी घेतलेली मेहनत पाहून फिरोज पंडोल यांचं कौतुक होतं आहे. या कामगिरीमधे प्रतिमा पंडोल, निलेश मोरे, पवन गुप्ता, अक्षय दिवटे, संदीप निशाद व राकेश दास यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा